माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांची कामगिरी विशेष उल्लेखनीय अशी आहे.

सांगली जिल्ह्यात कोरोना च्या पार्श्वभूमीवर एक महिला अधिकारी असूनही जिल्हा प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून  अहोरात्र आपले कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकारी तथा जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांची कामगिरी विशेष उल्लेखनीय अशी आहे.                देशात राज्यात सर्वत्र कोरोना साथीचा   प्रसार झाल्याने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा व जिल्ह्यातील जनता हादरून गेली आहे संपूर्ण सांगली जिल्ह्यात आपत्कालीन यंत्रणा राबविण्यात येत आहे सांगलीचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजित चौधरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस सिव्हिल सर्जन डॉक्टर संजय साळुंखे आणि संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा जोरात  जिल्ह्यातील रोगाची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पोलीस प्रशासन आरोग्य प्रशासन  जो तो आपले कार्य प्रामाणिकपणे कर्तव्यनिष्ठ पणाने बजावत आहे. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री जयंतराव पाटील साहेब यांनी जिल्हा प्रशासनाच्या विशेष कामगिरीचे कौतुक केले आहे . संपूर्ण सांगली जिल्ह्यातील जनता जिल्हा प्रशासनाचे कौतुक करत आहे     सांगली प्रशासनातील एक अशा महिला अधिकारी आहेत 24 तास आपले हेडकॉटर मध्ये राहून आपल्या कुटुंबाची पर्वा न करता आपले कार्यालयीन कामकाज 24 तास जिल्हा प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत त्या महिला अधिकारी म्हणजे जिल्हा माहिती अधिकारी वर्षापाटोळे...........                           जिल्हा प्रशासनाची संपूर्ण इतंभूत माहिती निर्णय राज्य केंद्र शासनाचे निर्णय आदेश या सर्वांच्या माहिती बातम्या  लोकांपर्यंत पोचविण्याचे काम वर्षा पाटोळे ह्या करीत आहेत. जिल्हा माहिती अधिकारी यांचे हे कामच आहे असे म्हणणाऱ्यांना प्रत्यक्ष आपल्या कुटुंबापासून दुर राहून 24 तास हेडकॉटर मध्ये राहून शासकीय काम करणे आणि ह्या आपत्तीकालीन परिस्थितीत हे तोंडाची गोष्ट नाही. जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांच्या कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.  माणसांकडे चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणण्याची दानत असावी लागते. उक्तीप्रमाणे खरोखरच जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांचे काम कौतुकास्पद आहे.